नाशिकनाशिक

Raj Thackeray : “दत्तक घेणारा बाप नाशिककडे फिरकलाच नाही!”; राज ठाकरेंनी नाशिकमध्ये वाचली भाजपच्या अपूर्ण प्रकल्पांची पाढे

Raj Thackeray On BJP : 15 वर्षांत स्वतःची पोरं तयार करता आली नाहीत; राज ठाकरेंचा भाजपवर खोचक प्रहार, तपोवन वृक्षतोडीवरून सरकारला घेरले

नाशिक | “2017 मध्ये नाशिकला दत्तक घेतो, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत,” अशा तिखट शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत त्यांनी भाजपच्या अपूर्ण प्रकल्पांची यादीच मतदारांसमोर वाचून दाखवली आणि “एकही आश्वासन पूर्ण झाले नाही,” असा कौल जनसमुदायाकडून मिळवला.

भाजपच्या ‘घराणेशाही’ आणि ‘दत्तक’ राजकारणावर टीका

राज ठाकरे यांनी भाजपच्या इतिहासाचा दाखला देत त्यांच्या सद्यस्थितीवर टीका केली. “1952 मध्ये जनसंघ स्थापन झाला, त्यातून भाजप आला. पण इतका जुना पक्ष असूनही यांना आजही स्वतःची माणसं तयार करता आली नाहीत. आजही यांना निवडणुकीसाठी दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यावी लागतात,” असे म्हणत त्यांनी भाजपमधील आयारामांच्या वाढत्या प्रभावावर बोट ठेवले.

अपूर्ण प्रकल्पांचा पाढा

राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारने नाशिकसाठी जाहीर केलेल्या प्रकल्पांची यादी वाचून दाखवत लोकांच्या प्रतिसादाची विचारणा केली:

नाशिक निओ मेट्रो: अद्याप कागदावरच.

आयटी आणि लॉजिस्टिक पार्क: प्रकल्पांची प्रगती शून्य.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे: फक्त घोषणाच उरली.

द्वारका-नाशिक उड्डाणपूल आणि बाह्य रिंग रोड: कामाचा पत्ता नाही. या प्रत्येक नावावर उपस्थित नाशिककरांनी “एकही काम झाले नाही” असे ओरडून सांगितले, ज्याचा दाखला देत राज ठाकरेंनी भाजपच्या ‘भुलथापां’ची पोलखोल केली.

तपोवन वाचवण्यासाठी साद

तपोवनातील वृक्षतोडीवर बोलताना राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. “2012 मध्ये मनसेची सत्ता असताना आम्ही एकही झाड न तोडता कुंभमेळा यशस्वी केला होता. मग आता झाडं तोडण्याचा अट्टाहास का? हे केवळ उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी चालले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. प्रभू रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी उध्वस्त केली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“मनाला टोचणी लागते…”

2012 ते 2017 या काळात मनसेने केलेल्या कामांची आठवण करून देताना ते म्हणाले, “आम्ही इतकी सुंदर कामं केली, शहराचा कायापालट केला, पण तरीही जनतेनं आम्हाला नाकारून भाजपच्या भुलथापांना पसंती दिली, याची मनाला टोचणी लागते.” नाशिककरांनी पुन्हा तीच चूक करू नये आणि शहराच्या खऱ्या विकासासाठी मनसे-शिवसेना युतीला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0