Rohit Pawar : जनता सत्ताधाऱ्यांना all out चा क्लीन स्वीप दिल्याशिवाय राहणार नाही… आमदार रोहित पवार

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार Rohit Pawar यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक ट्विट लिहिले आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांनी आणि युवा वर्गाने लोकसभेत सत्ताधाऱ्यांना down केले आहे
मुंबई :– आमदार रोहित पवार यांचे ट्विट लोकसभेच्या निवडणुकीपासून जास्त चर्चेत येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला आलेले अपयश आणि महाविकास आघाडीच्या परड्यात पडलेले यश यामुळे जनतेने सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला आहे असे म्हणले जात आहे. त्यातच रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचत ट्विट केले आहे त्यामध्ये रोहित पवार म्हणतात की जनता सत्ताधाऱ्यांना ऑल आउट चा क्लीन स्वीप दिल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला 17 जागा तर महाविकास आघाडीला 30 जागा आणि अपक्ष एक असे असा निकाल जाहीर झाला आहे.यंदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी आणि युवकांनी धडा शिकवला आहे असे रोहित पवार म्हणाले आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,दुष्काळ आणि अवकाळीने आधीच Down झालेला शेतकरी आता बोगस आणि ब्लॅकने विकण्यात येणारं बियाणं, पीककर्ज मिळत नसल्याने Out होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलाय. युवावर्गही बेरोजगारीने क्लीन bold झालाय अणि सरकार मात्र मैदानात न उतरता पॅव्हेलियनमध्ये बसून सत्तेचा आनंद घेत आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले की,यामुळंच शेतकऱ्यांनी, युवा वर्गाने सत्त्ताधारी पक्षाला लोकसभेत down केलं, सत्ताधाऱ्यांनी यातून धडा घेत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी, युवा वर्गासाठी नोकर भरती, गुजरातमध्ये गेलेले उद्योग परत आणणे या विषयांना प्राधान्य दिलं नाही तर जनता सत्ताधाऱ्यांना all out चा क्लीन स्वीप दिल्याशिवाय राहणार नाही..