धाराशिव
पत्रकार दिनानिमित्त कळंब पोलीस स्टेशन येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी ): दि.10 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वाजता कळंब पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते पत्रकारांना शुभेच्छा देत पेन व पुष्पगुछ देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कळंब व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते.



