मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “अजितदादांची ‘ती’ फाईल दिल्लीहून परत आली अन्…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा; ब्लॅक बॉक्सवरूनही उपस्थित केले प्रश्न

Sanjay Raut On Black Box : अमित शाहांनी फाईल बंद करण्यास दिला होता नकार? जरंडेश्वर कारखाना आणि भाजप-दादा संघर्षावर राऊतांचे मोठे विधान

मुंबई | खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. “ज्या कारणासाठी अजित पवार भाजपमध्ये गेले होते, ते कारणच पूर्ण झाले नव्हते,” असा दावा करत राऊत यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित फाईलचा मुद्दा लावून धरला आहे. यासोबतच, विमान अपघातातील ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या चौकशीवर संशय व्यक्त केला आहे.

काय आहे ‘ती’ फाईल? राऊतांचा गौप्यस्फोट

संजय राऊत यांच्या मते, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाशी संबंधित महत्त्वाची फाईल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे ‘बंद’ (Close) करण्यासाठी पाठवण्यात आली होती. “मात्र, अमित शाहांनी ती फाईल बंद करण्यास स्पष्ट नकार दिला. ‘तपासाची प्रक्रिया थांबू नका’ असा शेरा मारत त्यांनी ती फाईल महाराष्ट्रात परत पाठवली. यानंतर भाजपच्या नेत्यांकडून ‘दादा, तुमची फाईल बंद झालेली नाही’ असे बोलून दबाव तंत्र वापरले जात होते,” असा दावा राऊत यांनी केला. याच फाईलवरून गेल्या तीन महिन्यांपासून अजित पवार आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष सुरू होता, असेही त्यांनी नमूद केले.

‘ब्लॅक बॉक्स’ जळलाच कसा?

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, “रोहित पवारांनी मांडलेला ब्लॅक बॉक्सचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. इतिहासात पन्नास वर्षांनीही ब्लॅक बॉक्स सुस्थितीत सापडल्याची उदाहरणे आहेत. मग अजित दादांच्या फ्लाईटचा ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला किंवा नष्ट झाला हे तंत्रज्ञानाच्या युगात कसे शक्य आहे?”

खाजगी चौकशीची मागणी

संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, सरकार करत असलेल्या चौकशीवर पवार कुटुंबाचा विश्वास नसेल, तर त्यांना खाजगी एजन्सीमार्फत समांतर चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. “सरकारची या प्रकरणातील ‘मनशा’ साफ दिसत नाही,” असा थेट आरोपही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0