क्राईम न्यूजठाणेमुंबई

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या, 7 गुन्हे उघड

Thane Latest Crime News: 14 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त; तांत्रिक तपासाच्या आधारे मुंब्रा परिसरातून आवळल्या मुसक्या

ठाणे | ठाणे शहर आणि नवी मुंबई परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखा, घटक-1 ला यश आले आहे. या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबईतील एकूण 7 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सुमारे 14 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. Thane Police Latest News

12 दिवसांच्या थरारानंतर आरोपी जाळ्यात

4 डिसेंबर 2025 रोजी राबोडी परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास एका 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 60 ग्रॅमचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने खेचले होते. या झटापटीत वृद्ध महिला रस्त्यावर पडून जखमी झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने सलग 12 दिवस तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. अखेर मुंब्रा येथील शिळफाटा परिसरातून वसीम नूरमोहम्मद शेख (21 वय) आणि यासीन सिराज खामरे (22 वय) या दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सोनसाखळी चोरीचा मोठा साठा हस्तगत

पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात या दोघांनी ठाण्यातील राबोडी, कळवा, चितळसर, मुंब्रा आणि नवी मुंबईतील रबाले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 118 ग्रॅम वजनाचे 14 लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 60 हजार रुपये किमतीची जुपिटर स्कूटर, असा एकूण 14 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार आणि पोलीस पथक

अटक करण्यात आलेला आरोपी वसीम शेख याच्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात, तर यासीन खामरे याच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक दीपक घुगे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0