महाराष्ट्र
Trending

Samruddhi highway : समृद्धी महामार्गाने धावला महाराष्ट्राचा विकास! ‘महायुती’च्या तिन्ही इंजिनांनी दिला वेग

Samruddhi highway 701 km nashik igatpuri 4th phase  : आता ‘शक्तीपीठ महामार्ग’कडे लक्ष – मराठवाड्याच्या भविष्यास नवे वळण

मुंबई :महाराष्ट्राच्या विकासगाथेत नवा अध्याय जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडले. Samruddhi highway 701 km nashik igatpuri 4th phase नागपूरपासून मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या आठ तासांत शक्य होणार असून, ही केवळ रस्ता सुविधा नाही तर राज्याच्या प्रगतीचा गतिमार्ग आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

“महायुतीची गाडी तीन इंजिनांच्या जोरावर आता रुळावर आलेली आहे. या महामार्गाच्या यशानंतर आम्ही थांबणार नाही. पुढचा टप्पा आहे शक्तीपीठ महामार्ग — जो मराठवाड्याच्या आर्थिक इतिहासाला नवी दिशा देणार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई-नागपूर फक्त ८ तासांत; महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन दिमाखात

हा 805 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांदपर्यंत जाणार असून यामार्गे राज्यातील 12 महत्त्वाचे जिल्हे जोडले जातील. यामध्ये हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश आहे. तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च, 48 पूल, 30 बोगदे, 26 इंटरचेंजेस आणि आठ रेल्वे क्रॉसिंगसह हा महामार्ग भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.

फडणवीस म्हणाले, “2014 मध्ये ज्याचे स्वप्न पाहिले, ते आज उभे आहे. ही रचना केवळ वाहतूकसुविधा नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धीचा गाभा आहे. जेएनपीटीला राज्याच्या 24 जिल्ह्यांशी जोडणारा हा कॉरिडॉर भविष्यात वधावन बंदराशीही जोडला जाईल.”

राजकारणापेक्षा प्रगती, आणि घोषणा नव्हे तर कृती या भूमिकेवर महायुती सरकारचा भर असल्याचे या उद्घाटन सोहळ्याने पुन्हा अधोरेखित झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0