Nalasopara Sex Racket News : व्हॉट्सॲपवरून चालायचं सेक्स रॅकेट, सराईत दलालांवर गुन्हा दाखल

•नालासोपारा शहरात व्हॉट्सॲपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे. तसेच, दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे
नालासोपारा :- व्हॉट्सॲपवरून पीडित महिलेचा ग्राहकांना फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका दलालांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात. दोघांपैकी एका दलालाला झडप घालून पोलिसांनी अटक केली. पंकज राजकुमार गुप्ता निर्मल मंगर साव ( वय 22 रा.नगीनदासपाडा नालसोपारा पुर्व) असे अटक केलेल्या दलालाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज गुप्ता हा महिलेला कडून वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवलं. त्यानंतर पीडित महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी करण्याकरिता व्हॉट्सॲपवरून आणि मोबाईल फोनद्वारे ग्राहकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या माध्यमातून या वेश्या दलाल याला जेरबंद केले असून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
वेश्या दलाल पंकज गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे बोगस ग्राहकाला सेंट्रल पॉईंट फॅमिली रेस्टॉरंट अँड बार नील अपार्टमेंट सेंट्रल पार्क नालासोपारा या ठिकाणी बोलाविले होते. पोलिसांनी सापळा रुचून आरोपी वेश्यादलाल पंकज गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या तावडीतून दोन पीडित तरुणींचे सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात पोलिसांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 आणि 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये, अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार सुनिल पागी,अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या केली आहे.




