क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Virar Crime News : “तलवारीच्या धाकात ‘दहशतीचा’ वाढदिवस!”

Virar Latest Crime News : सोशल मीडियावर तलवारीने केक कापल्याचा फोटो व्हायरल; गुन्हे शाखेची वाजवली धडक,तलवार हस्तगत, परिसरातली दहशत संपली

विरार | सोशल मीडियावर व्हायरल Social Media झालेल्या ‘तलवारीने केक कापणाऱ्या’ फोटोमुळे पोलिस प्रशासनVirar Police हादरले. सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी थाटात वाढदिवस साजरा करत परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष-3, Virar Crime Branch 3 विरार यांनी फक्त काही तासांत गजाआड केलं. त्यांच्याकडून एक धोकादायक तलवारही जप्त करण्यात आली आहे.

प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा कक्ष-३ वर सोपविण्यात आली. पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने माहिती संकलन सुरू करून व्हायरल फोटोमधील व्यक्तींची ओळख पटवली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी विरेंद्र बटेश्वरनाथ दुबे (वय 42) आणि विकास शामसुंदर चौबे (वय 39) हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, याआधीही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 189(1)(2)(4), 190, हत्यार कायदा कलम 4 व 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तपासात पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, युवराज वाघमोडे, पोलीस अंमलदार राकेश पवार, तुषार दळवी आदींनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0