Mumbai Local Mega Block Cancel : गणेशभक्तांची गैरसोय टळली, रेल्वे प्रशासनावर प्रवाशांची तीव्र नाराजी
मुंबई :- गणेशोत्सवाच्या काळात लाखोंच्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. Mumbai Local Train News मध्य रेल्वेने रविवारी (31 ऑगस्ट) मध्य आणि हार्बर मार्गांवर नियोजित केलेला मेगाब्लॉक एक वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसह अनेक मंडळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास झाला असता. Mumbai Sunday MegaBlock Cancel
मध्य रेल्वेने रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द होणार होता. सुट्टीच्या दिवशी अनेक गणेशभक्त चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर उतरून लालबाग आणि चिंचपोकळी परिसरातील गणपतीच्या दर्शनासाठी जातात. हा ब्लॉक झाल्यास या भाविकांचे मोठे हाल झाले असते.
या गंभीर गैरसोयीकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे ‘लोकसत्ता’ने आपल्या बातमीतून समोर आणले. ‘एका वृत्तानंतर निद्रिस्त असलेल्या रेल्वे प्रशासनाला जाग आली.
प्रशासनावर प्रवाशांची नाराजी
एका वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली. यामुळे गणेशभक्तांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मध्य रेल्वेने गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात ब्लॉकचे नियोजन केल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या मते, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईतील गणेशोत्सव आणि भाविकांची गर्दी याची शून्य माहिती असल्याचे दिसून येते. अशा वेळी केवळ खेद व्यक्त करून रेल्वे प्रशासन मोकळे होते, अशी टीका प्रवासी संघटनांनी केली आहे.


