मुंबई

Disha Patni Firing News : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार; ‘गोल्डी ब्रार गँग’ने घेतली जबाबदारी

Disha Patni Latest Firing News Update : ‘सनातन धर्माचा आणि संतांचा अपमान केल्याचा’ आरोप, सोशल मीडियावर धमकावणारी पोस्ट

ANI :- बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या बरेलीतील घरावर शुक्रवारी (13 सप्टेंबर) पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर लगेचच सोशल मीडियावर ‘रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँग’ नावाच्या अकाउंटवरून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. कथितपणे प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्यामुळे हा हल्ला घडवून आणल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पहाटे 4.30 वाजता गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील दिशा पाटनीच्या घराबाहेर पहाटे 4.30 वाजता दोन वेळा हवेत गोळीबार झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावरील धमकावणारी पोस्ट

गोळीबारानंतर तात्काळ, ‘रोहित गोदारा गोल्डी ब्रार’ नावाच्या फेसबुक अकाउंटवर एक हिंदीमध्ये पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये, “खुशबू पाटनी/दिशा पाटनीच्या घरावर (व्हिला नंबर 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, यू.पी.) झालेला गोळीबार आम्ही घडवून आणला आहे,” असे म्हटले आहे.

पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, “तिने (दिशा/खुशबू पाटनी) आमचे संत प्रेमानंदजी महाराज व अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला होता. तिने आपल्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला.” या कृत्याला त्यांनी ‘ट्रेलर’ म्हटले असून, भविष्यात जर पुन्हा असे कृत्य घडले तर “घरातील कोणालाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली आहे. हा संदेश फक्त दिशा पाटनीसाठी नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी असल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता पडताळणी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0