मुंबई

“अजानवरील लाऊडस्पीकरबाबत मुस्लीम समाजाची भावना लक्षात घ्यावी” – आमदार अबू आझमींची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी

पोलीस कारवाईमुळे मुस्लीम समाजात असंतोषाचे वातावरण – आजमी. पोलिस, मशीद प्रतिनिधी व मुस्लिम नेत्यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती

मुंबई :- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मशिदींमध्ये अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरविषयी निवेदन दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी मुस्लीम समाजात वाढत चाललेल्या असंतोषाकडे लक्ष वेधले असून, सरकारने या विषयावर तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

आजमी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, “मुंबई आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कायद्याचे पालन करत आहे. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती अजानवरील लाऊडस्पीकरबाबत आक्षेप घेत सांप्रदायिक तणाव निर्माण करत आहेत.” त्यांनी विशेषतः माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवायांकडे लक्ष वेधले.

पोलीस अधिकारी मशिदींच्या ट्रस्टींवर लाऊडस्पीकर काढण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप करत आजमी म्हणाले की, “पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे लाखो मुस्लिमांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.” त्यांनी या विषयावर सर्व संबंधित पक्षांची – पोलिस अधिकारी, मशीद प्रतिनिधी, आणि मुस्लिम नेते – यांच्या सहभागाने एकत्र बैठक बोलवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

“संवाद आणि सहकार्यानेच या विषयावर मैत्रीपूर्ण तोडगा निघू शकतो,” असेही आजमी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0