क्राईम न्यूजठाणेमुंबई

Dadar Robbery News : दादरमधील कपड्याचे दुकान फोडणाऱ्या त्रिकुटाला बेड्या! भोईवाडा पोलिसांनी काशी-मीरा परिसरातून आरोपींना ठोकल्या बेड्या

Dadar Robbery Latest News : शटर उचकटून 97 हजारांची रोकड पळवली होती; तपासात व्ही.पी. रोड आणि माटुंगा येथील घरफोडीचे गुन्हेदेखील उघड

मुंबई | दादर पूर्व परिसरातील एका कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास करणाऱ्या तीन सराईत घरफोड्यांना अटक करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. या आरोपींच्या अटकेमुळे मुंबईतील इतर दोन पोलीस ठाण्यांमधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी शिताफीने ही कारवाई केली आहे. Mumbai Police Latest Crime News

काय आहे प्रकरण?

दादरच्या बी. जे. देवरूखकर रोडवरील ‘विवेकानंद मेन्शन’मध्ये असलेल्या एका कपड्याच्या दुकानात 12 जानेवारीच्या रात्री घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण 97,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाचे चक्र आणि फिल्मी स्टाईल अटक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. इस्माईल, बरकत आणि अरबाज अशी या संशयितांची नावे समोर आली. हे त्रिकूट भाईंदरजवळील काशी-मीरा परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा लावला. सुरुवातीला बरकत शेख आणि इस्माईल शहा यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अरबाज शहा यालाही पोलिसांनी शिताफीने अटक केली.

सराईत गुन्हेगार आणि गुन्ह्यांची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.

1.बरकत शफीकउल्ला शेख (20 वय)

2.इस्माईल अस्लम शहा (25 वय)

3.अरबाज इस्माईल शहा (25 वय)

हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी भोईवाडा येथील गुन्ह्याव्यतिरिक्त व्ही.पी. रोड पोलीस ठाणे आणि माटुंगा पोलीस ठाणे यांच्या हद्दीत केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. हे आरोपी रात्रीच्या वेळी शटर उचकटून चोरी करण्यात निष्णात आहेत.

या पथकाने केली यशस्वी कामगिरी

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ-04 च्या पोलीस उप-आयुक्त रागसुधा आर., सहाय्यक आयुक्त घनश्याम पलंगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासी अधिकारी राहुल चौधरी, अनिल भोंग आणि त्यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0