क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Drug Racket : ‘एम.डी.’ ड्रग्जसह नायजेरियन महिला अटकेत! – तुळींज पोलिसांचा पाच कोटींच्या अंमली रॅकेटवर मोठा घाव

Mira Bhayandar Police Busted Drug Racket : मिरा-भाईंदर पोलिसांच्या विशेष मोहिमेला मोठे यश; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर कारवाईचा बडगा ; विदेशी महिलेकडून अंमली पदार्थ हस्तगत

नालासोपारा :- एकीकडे देशभरात अंमली पदार्थांविरोधात मोहिमेने वेग घेतलेला असताना, नालासोपारा शहरात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 5 कोटी 50 लाख 42 हजार 840 रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. Mira Bhayandar Drug Racket Busted News याप्रकरणी नायजेरियन नागरिक असलेली रिटा फटी कुरेबेवेई (वय 26 रा. अंशीत प्लाझा प्रगती नगर नालासोपारा) या महिलेला अटक करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय अंमली जाळ्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ठाणे येथील पेट्रोलपंप परिसरात एक विदेशी महिला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या व्यवहारासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित हालचाल करत, ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने कारवाई करत रिटा हिला रंगेहाथ पकडले. तिच्या ताब्यातील बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर एम.डी. आढळले. चौकशीतून उघड झाले की, ती भारतात अनधिकृतपणे राहत असून, अंमली पदार्थांचे वितरण करणाऱ्या टोळीसाठी काम करत होती.रिटा हिच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात Tulij Police Staion एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिच्या संपर्कातील इतर गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीनंतर तिने हे ड्रग्स कोठून आणले, कोणत्या नेटवर्कचा भाग आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल फड करत आहेत.

ही कारवाई जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त ,अतिरिक्त कार्यभार परीमंडल-2 वसई, उमेश माने-पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त , तुळींज विभाग, विजय जाधव, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर, दहशतवाद विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी डोके, सहाय्यक फौजदार सुतनासे, पोलीस हवालदार उमेश वरठा,आशपाक जमादार, राहुल साळुंखे, सचिन कांबळे, राहुल कदम, आजिनाथ गिते, पोलीस अंमलदार प्रसाद पालवे, महिला पोलीस अंमलदार शितल सानप, पुजा अहिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0