छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhajinagar Bribe News : “नोंदणीसाठी लाच” – सिडको कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले!

•प्लॉट नोंदणीसाठी एक हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप,लाचलुचपत विभागाच्या सापळा कारवाईत आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर | सिडको कार्यालयातील एका मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्याला तक्रारदाराकडून भूखंड नोंदणीसाठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. आरोपीने सिडकोच्या नोंदणी कामासाठी एक हजार (1000) रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या प्लॉटची (गट क्र. 140, प्लॉट क्र. 29, क्षेत्रफळ 65.78 चौ.मी.) नोंदणी आणि चलन काढून देण्यासाठी सिडको कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने 1,000 रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. 17 जून रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार आणि पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत श्री. दिलीप ढाले (वय 52, व्यवसाय – मानधनावर कर्मचारी) यांच्याकडून लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या अंगझडतीत 600 रुपये रोख व एक मोटोरोला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाईल तपासासाठी जप्त केला असून त्याच्या घराची झडतीही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मार्गदर्शक अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद अघाव, व पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पथकामध्ये युवराज हिवाळे, राजेंद्र नंदिले यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0