Anti Corruption Bureau Sambhaji Nager News : पाटबंधारे विभागाचा कारकून निघाला लाचखोर

Anti Corruption Bureau Sambhaji Nager News : छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; कारकुनाला पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
छत्रपती संभाजीनगर :- कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबा या गावात पाटबंधारे विभागात कारकून असणाऱ्या राहुल पांडुरंग सुरवसे (42 वर्ष) याला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau Sambhaji Nager Department यांनी पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
कारकून सुरवसे यांनी तक्रारदाराकडे पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पातून मातीचा गाळ JCB ने उपसा करून ट्रॅक्टर ने वाहतूक करून त्यांचे शेतात टाकत आहेत, त्यांना माती गाळ शेतात टाकुन देण्यासाठी व त्यांचे JCB व ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आरोपी सुरवसे यांनी पंचा समक्ष 5 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 5 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच 15 मे 2024 रोजी पंचासमक्ष 5हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. कारकून यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून पिशोर पोलीस ठाण्यात (Pishor Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Anti Corruption Bureau Sambhaji Nager News

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि . छत्रपती संभाजी नगर पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, बागुल, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर, यांनी यशस्वी सापळा रचून लाचखोर पाटबंधारे विभागाच्या कारकूनाला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Sambhaji Nager News