Mumbai Police News : आग्रीपाडा पोलिसांची मोठी कामगिरी! दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश – 6 मोटारसायकली हस्तगत

Mumbai Agripada Police News : मुंबई, ठाणे परिसरात दुचाकी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस,सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोघे अटकेत
मुंबई :- डॉ. आनंदराव नायर मार्ग, आरटीओ कॉलनी, आग्रीपाडा येथे उभी असलेली एक बर्गमॅन मोटारसायकल चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांची माहिती यांच्या आधारे अवघ्या काही दिवसांत दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. Mumbai Police Latest News
तपासात या दोघांनी केवळ आग्रीपाडाच नव्हे तर नागपाडा, माहिम, मुंब्रा भागांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचं उघड झालं. पोलिसांनी एकूण सहा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
बर्गमॅन चोरीचा तपशील
11 जुलै 2025 रोजी रात्रीच्या सुमारास जनरल मेडिकल समोर उभी असलेली सुझुकी बर्गमॅन (क्र. MH01DW4778) अज्ञात इसमाने चोरी केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी कलम 303(2), 317(2), 3(5) भा.दं.सं. 2023 नुसार गुन्हा दाखल केला होता.
दोघा आरोपींना अटक
तपासात संशयित आरोपींची ओळख पटली. त्यापैकी
1.मोहम्मद शाद मोहम्मद शफी कुरेशी (19 वय) – नागपाडा येथून 16 जुलै रोजी अटक
2.मोहम्मद अकबर मुनीर खान (24 वय) – बदलापूर येथून 17 जुलै रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून बर्गमॅन गाडी हस्तगत करण्यात आली असून, अधिक तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाच गुन्ह्यांची कबुली – सहा गाड्या जप्त
तपासादरम्यान पोलिसांना समजले की आरोपींनी खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गाड्या चोरल्या आहेत.
आग्रीपाडा पोलीस ठाणे – 1 गुन्हा
नागपाडा पोलीस ठाणे –2 गुन्हे
माहिम पोलीस ठाणे – 1 गुन्हा
मुंब्रा पोलीस ठाणे – 1 गुन्हा
एकूण 6 मोटारसायकली त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आल्या आहेत.


