मुंबई

Bhiwandi Water Supply Cut : भिवंडीला जलझटका! मंगळवारी 24 तासांचा पाणीपुरवठा बंद

•स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिनी दुरुस्ती व वीज मीटर बदलाचे काम,शहरातील डझनभर भागांना पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळणार

भिवंडी | भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून मंगळवार, 22 जुलै रोजी सकाळी 9 ते बुधवार, 2 जुलै सकाळी 9 या 24 तासांच्या कालावधीसाठी जलपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात पाणी मिळणार असून, संपूर्ण शहरात पाणीटंचाईची तीव्र झळ बसणार आहे.

शहाड केंद्रात वीज मीटर बदल, जलवाहिनीत गळती दुरुस्ती

भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात स्टेम कंपनीमार्फत पाणीपुरवठा केला जातो.

शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर वीज मीटर बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्याचबरोबर, जलवाहिनीत गळती आढळल्याने दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे.
या दोन्ही कामांसाठी पाणीपुरवठा पूर्णतः थांबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पाणीपुरवठा खंडित राहणाऱ्या परिसरात पुढील प्रमुख भागांचा समावेश आहे:

ममता टाकी, चाविंद्रा गाव, पटेलनगर, फरीदबाग, संगमपाडा, कसारआळी, आदर्श पार्क, अजयनगर, इंदिरानगर, कल्याण रोड, शिवाजीनगर, अजमेरनगर, नारपोली, देवजीनगर, इस्लामपुरा, नेहरूनगर, वेताळपाडा, डोलारे पेट्रोलपंप परिसर, कामतघर, भाग्यनगर, पद्यानगर, कुरेशनगर, रेल्वे स्टेशन रोड, नवीन ताडाळी, साठे नगर, मुश्ताक कंपाऊंड, पदमानगर, सुभाषनगर, गोपाळनगर, जैतूनपुरा आणि आजूबाजूचे इतर परिसर.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.याचबरोबर, दुरुस्ती व देखभाल कामांना सहकार्य करून संकटकाळात पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0