क्राईम न्यूजमुंबई

House Arrest Show : अभिनेता एझाज खानविरोधात गुन्हा दाखल

case filed against ejaz Khan : एझाज खान तसेच दिग्दर्शक राजकुमार पांडे यांच्याविरोधात अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई :- ‘हाऊस अरेस्ट’ या रिॲलिटीशो House Arrest Show मध्ये महिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी होस्ट एझाज खान तसेच दिग्दर्शक राजकुमार पांडे यांच्याविरोधात अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात Amboli Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘उल्लू’ या ॲपवर ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा रिॲलिटी शो सुरू असून त्याची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. या क्लिपमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. case filed against ejaz Khan या शोचा निवेदक (होस्ट) एझाज खान सहभागी स्पर्धक तरुणींबरोबर अश्लील संवाद साधून अश्लील कृत्य करत होता. या विरोधात बंजरग दलाच्या तक्रारीवरून अश्लील कृत्य, महिलांची असभ्य वर्तन, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शोच्या विरोधात बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया (40 वय) यांनी शुक्रवारी अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदनाद्वारे शो बंद करण्याची मागणी केली होती. तसेच,भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी करत असभ्य वर्तन करणाऱ्या एझाज खान याला अटक करण्याची मागणी केली आहे.

हा रिॲलिटी शो ‘उल्लू’ या ॲपवर प्रसारित होत आहे. उल्लूचे कार्यालय अंधेरी पश्चिमेच्या लोटस बिझनेस पार्कमध्ये असून बजरंग दलाने त्यांना निवेदन देऊन हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण थांबविण्याची मागणी केली होती. उल्लू ॲपने अश्लील मजकूर असलेली शो तयार केला, त्याचे दिग्दर्शन केले, एझाज खान याने महिलांचा अवमान केल्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अंबोली पोलीस ठाण्यात उल्लू ॲपचे निर्माते, दिग्दर्शन राजकुमार पांडे आणि निवेदन एझाज खान यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 3 (5), माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67 (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम 1986 च्या कलम 4,6 आणि 7 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0