मुंबईठाणे
Trending

Rohit Pawar : “अजितदादा सत्तेबाहेर पडून आमच्यासोबत येणार होते, हेच काही जणांना खटकलं का?”; रोहित पवारांचा ‘घातपाता’च्या शक्यतेवर मोठा दावा

Rohit Pawar On Ajit Pawar Accident : जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘150 पट’ ताकद कुणी रोखली? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचे खळबळजनक प्रश्न

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलेले असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ‘घातपाता’च्या सिद्धांताला (Theory) दोन वेगळ्या दृष्टिकोनातून मांडले आहे. “अजितदादा महायुतीतून बाहेर पडून पुन्हा आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते, हाच विचार एका गटाला आवडला नसावा का?” असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित करत संशयाची सुई एका विशिष्ट गटाकडे वळवली आहे.

घातपाताचे दोन कोन: रोहित पवारांचे विश्लेषण

रोहित पवार यांनी अपघातामागे राजकीय षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवताना दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले:

सत्तेतील सहभाग: दादा आणि आम्ही एनडीए (NDA) सोबत सत्तेत जाणार ही गोष्ट कदाचित काही लोकांना आवडली नसावी.

रस्त्यावरची लढाई: दादा एनडीएमधून बाहेर पडतील आणि पुन्हा शरद पवारांसोबत येऊन सामान्य जनतेची लढाई लढतील, हा दृष्टिकोन दुसऱ्या एका गटाला मान्य नसावा.

“यात जर राजकारण किंवा घातपात असेल, तर या दोनपैकी एका दृष्टिकोनाला विरोध करणाऱ्या गटाचा यात हात असू शकतो,” असे खळबळजनक विधान रोहित पवारांनी केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘त्या’ कागदपत्रांचे गुपित काय?

रोहित पवारांनी यावेळेस निवडणुकीच्या नियोजनाचा संदर्भ देत एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांना लागणारी ‘मार्गदर्शक कागदपत्रे’ आणि आर्थिक नियोजनाची धुरा दादांकडे होती.

200 पट ताकदीचा निर्णय: “मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांमध्ये मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती. पण दुर्दैवाने 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांच्या निधनानंतर ही ताकद केवळ 50 पटच लावण्यात आली,” असा दावा रोहित पवारांनी केला.

150 पट ताकद कुठे गेली?: उरलेली 150 पट ताकद का लावली गेली नाही? निवडणुकीच्या तोंडावर ताकद कमी करून कुणाला फायदा पोहोचवायचा होता? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

नियोजन दादांचे, वितरण दुसऱ्या नेत्याचे?

अपघातापूर्वी सर्व नियोजन अजितदादा स्वतः बघत होते, मात्र त्या कागदपत्रांचे आणि संसाधनांचे वितरण दुसराच एखादा नेता करत असल्याची माहिती समोर येत आहे. “जर जिल्हा परिषदेचे उमेदवार पाहिले तर त्यांना हा मुद्दा नक्कीच पटेल,” असेही रोहित पवार म्हणाले. विलीनीकरणाची चर्चा केवळ दादा आणि आम्हालाच माहिती होती, असे सांगत त्यांनी या प्रकरणातील गुढता अधिक वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0