Yogesh Kadam : अंमली पदार्थ विक्री करणारे आणि अवैध घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले

Minster Yogesh Kadam Visit Mira Bhayandar Police Office : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला भेट
मीरा रोड :- राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम Yogesh Kadam यांनी मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाला Mira Bhayandar Police Office भेट दिली. यावेळी योगेश कदम हे पहिल्यांदाच आयुक्तालयात भेट दिल्याने त्यांचे स्वागत पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले आहे.
मीरा-भाईंदर वसई विरार येथील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातील सर्व शाखा, विभाग, नियंत्रण कक्ष, संवाद हॉल याची पाहणी केली आहे. त्यानंतर मंथन हॉल येथे आयोजित बैठकीमध्ये योगेश कदम यांनी अंमली पदार्थ तस्करी करणारे तसेच राज्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार आगामी 100 दिवसांमध्ये कारवायाच्या कामकाजाबाबतच्या सूचना योगेश कदम यांनी दिले आहे. तसेच, पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित असलेल्या प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन योगेश कदम यांनी या बैठकीत दिले आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.