
Mumbai Mega Block News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; अप जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावर वळवणार,सीएसएमटी ते पनवेल दरम्यान ब्लॉक
मुंबई | मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी (22 जून) पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. Mumbai Mega Block News
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 या वेळेत अप जलद गाड्यांना धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना काही प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
यासोबतच, सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, विद्याविहार, कंजूरमार्ग, विक्रोळी आणि गवानी मार्ग स्थानकांवर या गाड्या थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
सीएसएमटी ते वाशी/पनवेलदरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत बंद राहील. दरम्यान, पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स-हार्बर गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही
पश्चिम रेल्वेने मात्र रविवारी कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला असून, या मार्गावरील सेवा नियमित सुरू राहणार आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाची पूर्वनियोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


