
Navi Mumbai Murder News : तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी एका सतारा वार्षिय युवकला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.
नवी मुंबई :- नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एका बारा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी एका सतारा वार्षिय युवकला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. तुर्भे इंदिरा नगर येथील एक बारा वर्षीय मुलगी हरवली असल्याची तक्रार शुक्रवारी तिच्या पालकांनी तुर्भे एम आय डी सी पोलीस ठाण्यात MIDC Police Station दाखल केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. अकराच्या सुमारास अपहरण झालेली युवती जखमी अवस्थेत सापडली असून तिच्यावर डी वाय पाटील रुग्णालयात DY Patil Hospital दाखल केले आहे. अशी माहिती तिच्या एका नातेवाईकाने पोलिसांना दिली. पोलीस पथक रुग्णालयात दाखल झाले. मात्र तो पर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. Navi Mumbai Latest Crime News
चेहऱ्यावर दगडासारख्या वजनदार वस्तुने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. मुलगी जखमी अवस्थेत जिथे सापडली टि जागा निर्जन होती. तिथे तपासणी करण्यात आली. चौकशीत घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने तिचा मोबाईल सापडला असे सांगून तिच्या पालकांना दिला होता. हे समोर येताच पोलिसांनी त्या युवकला ताब्यात घेत चौकशी केली असता किरकोळ वादातून दोघांची भांडणे होऊन झटापट झाली. त्यात ती पडली असता त्या युवकाने तिच्या डोक्यात दगड घातला. ही माहिती समोर आली. संशयित अल्पवयीन असल्याने अटक करण्यात आली नाही. Navi Mumbai Latest Crime News
ताब्यात घेण्यात आलेल्या सतारा वार्षिय आरोपींला शिरतणे एम.आय.डी.सी. तुर्भ नवी मुंबई येथील राहणारे बालकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याचेकडे चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करून बाल न्याय मंडळा रामक्ष हजर करीत आहोत.
पोलीस पथक
मयुर भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुर्भे विभाग, अजयकुमार लांडगे राहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली आबासाहेब पाटील, वपोनि, तुर्भे पोलीस ठाणे, सुनिल शिंदे, वपोनि, मध्यवर्ती कक्ष, निरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कक्ष-1 वाशी, उमेश गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कक्ष-2 पनवेल, हनिफ मुलानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कक्ष-3, कळंबोली, नवी मुंबई व पथकाच्या मदतीने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केलेली आहे.


