Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमधील सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
उल्हासनगर :- उल्हासनगर पोलीस ठाण्यात Ulhasnagar Police Station दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घरात घुसून मारहाण करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, नुकसान करणे, शिविगाळ व दमदाटी करणे, या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. Ulhasnagar Crime News 16 एप्रिल 2024 दरम्यान आरोपी विकास उर्फ पप्या अशोक शिंदे, वय 28,रा. उल्हासनगर-2) याला बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुका या भागाच्या महसूली हद्दीतून दोन वर्षे कालावधी करीता तडीपार करण्यात आले होते.
आरोपी विकास उर्फ पप्या अशोक शिंदे असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत मारहाणीचे 2 गुन्हे व सरकारी कामात अडथळा निर्माण करणेचा 1 गुन्हा असे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी सराईतांवर एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला येरवडा कारागृहात स्थानबध्द केले आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिस उपआयुक्तांकडून ही कारवाई सुरू राहणार आहे.
पोलीस पथक
सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त, उल्हासनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंद्रहार गोडसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व पोलीस पथक यांनी पार पाडले आहे.