क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

स्वस्तात सोने देण्याचे आमिष: नवी मुंबईत 8 लाखांची फसवणूक

Navi Mumbai Gold Fraud News : व्हिडीओ कॉलवर सोन्याची बिस्किटे दाखवली, विश्वास संपादन करून फसवणूक; सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी मुंबई :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका तरुणाची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी 2025 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीच्या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात Sanpada Police Station पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Latest Crime News

मीरा रोड येथे राहणारे 22 वर्षीय प्रेम भानुशाली यांची ओळख राकेश, राजेश, खन्ना आणि राजू यांच्याशी झाली होती. या आरोपींनी प्रेम यांना कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला नकार दिल्यावर त्यांनी व्हिडीओ कॉलवर सोन्याची बिस्किटे दाखवून आणि त्याची खात्री करून विश्वास संपादन केला. यामुळे प्रेम यांनी सोने खरेदीसाठी 8 लाख रुपयांची रोकड जमा केली.

29 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता सानपाडा स्टेशनबाहेर पैसे आणि सोन्याची देवाण-घेवाण करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे प्रेम आणि राकेश भेटले. राकेशने अंदाजे 15 लाख रुपये किमतीची तीन सोन्याची बिस्किटे दाखवली, पण ती प्रेम यांच्या हातात दिली नाहीत. प्रेम यांनी 8 लाख रुपये दिल्यानंतर, आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. काही वेळातच एक गाडी तिथे आली, ज्यातून राजेश, खन्ना, राजू आणि इतर काही व्यक्ती उतरले. त्यांनी घाई असल्याचा बहाणा करत राकेशसह सर्वजण गाडीत बसून पसार झाले.

प्रेम यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींची संख्या जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रेम यांनी बुधवारी (30 जुलै) सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राकेश, राजेश, खन्ना, राजू आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0