Nalasopra Drug News : अंमली पदार्थाची विक्री करणारे दोन जण अटकेत; 1 कोटी 4 लाख 16 हजार रुपये किंमतीचे एमडी जप्त

Nalasopra Police Arrested Drug Sumggler : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन महिलेला आणि एका रिक्षावाल्याला पोलिसांनी केली अटक
नालासोपारा :- अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे यांच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी Anti Narcotics Take Action On illegale Drug Selling कारवाई करत असताना एका नायजेरियन महिला आणि रिक्षावाला यांना कोट्यावधीची अंमली पदार्थ सह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी नायजेरियन महिलेच्या ताब्यातून तब्बल एक कोटी एक लाख 24 हजार रुपये किंमतीचे 520.8 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले आहे. तसेच महिलेचा साथीदार रिक्षा चालक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 14.6 ग्रॅम वजनाचे दोन लाख 12 हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थाचे तस्करीचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ पोलिसांनी अंमली पदार्थ कक्षाच्या पथकाला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे यांचे पथक परिमंडळ 2 परिसरात गस्ती घालत असताना वाधेश्वर बालाजी हनुमान मंदिरा समोर रोडवर, नालासोपारा (पुर्व) या परिसरात एक नायजेरियन महिला संशयितरित्या आढळून आली पोलिसांनी त्या महिलेची अंग जडती आणि चौकशी केली असता त्या महिलेकडे तब्बल कोट्यावधी रुपयांचे एमडी अंमली पदार्थ होते तसेच तिचा साथीदार रिक्षा चालक याच्याकडेही लाखो रुपयांचे अंमली पदार्थ होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात एनडीपीसीए आणि विदेशी नागरी अभियान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास आमले पदार्थ विरोधी कक्षामार्फत चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, पोलीस हवालदार पी.डी. पाटील,एस. ए. आव्हाड, एस. एस. घेरे, पी.डी. टक्के, एम. पी. पागधरे, व्ही.ए.आवळे, ए.बी.यादव, महिला पोलीस हवालदार लतादेवी एक्कलदेवी आणि पोलीस हवालदार डी. एस. इंगळे यांनी केली