क्राईम न्यूजमुंबई

Nalasopra Robbery News : महिलेचे अपहरण, दागिन्याची चोरी आणि लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप

Nalasopra Kashmira Police Robbery News : याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश गोसावी आणि उमेश उर्फ राकेश जसवंत याच्या विरूध्द लैंगिक अत्याचार, अपहरण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.

नालासोपारा :- पीडित महिलेला 20 डिसेंबर 2017 रोजी काशिमीरा नाका ते घोडबंदर असा प्रवास करण्याकरिता महिलेने रोडवरील कारला हात दाखवून लिफ्ट मागितली होती. Nalasopra Latest Robbery News महिलेला कारमध्ये बसवून दोन्ही आरोपींनी कार मधून घेऊन जात असताना त्या महिलेचे अपहरण करून, लैंगिक अत्याचार केले तसेच तिच्याकडील असलेले सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार महिलेने काशिमिरा पोलिसांना दिली होती. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भादवी कलम 376,312,363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तात्कालीन पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी घटनेच्या तपास करताना त्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली होती. सुरेश पांडुरंग गोसावी आणि उमेश उर्फ राकेश जसवंत यांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात सबळ पुरावे गोळा करून आरोपींच्या विरोधात दोष पत्र दाखल केले होते.

न्यायाधीश वसुधा भोसले तदर्थ जिल्हा न्यायाधीश-3 जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांनी गुन्ह्यातील आरोपींना भादवि कलम 263 करिता सात वर्षांचा कारावास पन्नास हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना सश्रम करावास तसेच कलम 392 अंतर्गत आरोपींना 14 वर्षाची कारवास सुनावण्यात आली आहे. तर कलम 376 (2) (ग) करिता जन्मठेप (अजीवनकारावास) सुनावली आहे.प्रकाश गायकवाड, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड विभाग, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, काशिमीरा पोलीस ठाणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0