Chava Movie : छत्रपती संभाजी महाराजांवर बनवलेल्या “छावा” चित्रपटावरून गदारोळ, दिग्दर्शकाने राज ठाकरेंची भेट घेतली,

Chava Movie Director Meet Raj Thackeray : छत्रपती संभाजी महाराजांवर बनवलेल्या ‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवरून महाराष्ट्रात निदर्शने होत आहेत. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
मुंबई :- छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विक्की कौशलचा “छावा” हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे. Chava Movie या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याचं कळतंय, ज्याचा जोरदार विरोध होत आहे.
शिवप्रेमींसोबतच महाराष्ट्राच्या मंत्र्यानेही आक्षेप नोंदवला असून काही दृश्ये हटवण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. या वादांमध्ये आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांची भेट घेतली.
छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा लेजिम वाजवतानाचा सीन काढून टाकणार असल्याचे सांगितले.छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह अमेय खोपकरही उपस्थित होते. विशेष म्हणजे छावा या चित्रपटावर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून यावरून महाराष्ट्रात वाद सुरू आहे.
छावाबाबत वाद काय?
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या छावा या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. मात्र, या चित्रपटातील काही दृश्यांमुळे संभाजी महाराजांच्या सन्मानाला धक्का पोहोचणार असल्याचा दावा केला जात आहे.ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्यावरून वाद सुरू झाले आहेत. वास्तविक, राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसूबाई नाचत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.