ठाणेमुंबई
Trending

Nalasopra Drugs News : नालासोपाऱ्यातील ‘एमडी’ कारखान्यावर कारवाई; वरिष्ठ निरीक्षकानंतर आता पोलीस अंमलदार सुजय पाटील निलंबित

Nalasopra Pelhar Police Latest News : अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका; मुंबई पोलिसांच्या धाडीनंतर पेल्हार पोलीस ठाण्यात मोठी कारवाई

नालासोपारा :- नालासोपारा येथील पेल्हार परिसरात मुंबई पोलिसांनी Nalasopra Drug News धाड टाकून अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त केल्याच्या घटनेचे गंभीर पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावरून पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले होते, तर आता त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुजय पाटील Police Sujay Patil Resigned यांचेही निलंबन करण्यात आले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांचे संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. Nalasopra Police Latest News

नालासोपारा पूर्वेकडील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (MD) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. 25 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई पोलीस परिमंडळ सहाच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकून साडेतेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आणि पाच जणांना अटक केली. हा कारखाना पेल्हार पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ असतानाही स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. Nalasopra Drug Busted News

या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन केले होते. त्यानंतर आता पोलीस अंमलदार सुजय पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. Nalasopra Latest Crime News

मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (विरार विभाग) यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. या चौकशीदरम्यान, अंमलदार सुजय पाटील यांचे असामाजिक आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसोबत संबंध असल्याची माहिती मिळाली. पाटील यांच्या भ्रमणध्वनीच्या पडताळणीतून त्यांचे अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या सोबतचे संबंध स्पष्टपणे निष्पन्न झाले, त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त (विरार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0