Lakhani News : तीजसाठी माहेरी निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला
Lakhani News : लाखनीजवळ बोलेरोची ट्रकला भीषण धडक; सहा महिला, तीन चिमुकल्यांसह नऊ जणांचा मृत्यू, १३ जखमी
Lakhani News : लाखनी, महाराष्ट्र मिरर : तीज सणासाठी छत्तीसगडहून नागपूरकडे माहेरी निघालेल्या महिलांच्या आनंदी प्रवासाचा भीषण अपघातात शोकांत झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता. ११) पहाटे बोलेरोने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सहा महिला आणि तीन चिमुकल्यांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले.https://maharashtramirror.com/ Lakhani News
पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास पिंपळगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. एमएच ४९ वाय ९८१० क्रमांकाची बोलेरो रायपूरहून नागपूरच्या दिशेने येत होती. वाहनात महिला आणि लहान मुलांसह २२ प्रवासी होते. त्याचवेळी पेट्रोल पंपावरून युपी ७२ बीटी ७९७४ क्रमांकाचा ट्रक महामार्गावर येत होता. बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Lakhani News
धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला. पहाटेची वेळ असल्याने अनेक प्रवासी झोपेत होते. त्यामुळे त्यांना स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही. अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले.https://maharashtramirror.com/ Lakhani News
मृतांमध्ये जामबई रामअवतार वर्मा (५०), मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६), धैर्य रुपेश उईके (४), स्वीटी रुपेश उईके (६), गायत्री रुपेश उईके (३०), गणेशीया अरावत पटले (२२), सरिता विजय वर्मा (३०), ग्रेशा राजकुमार वर्मा (२) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (३५) यांचा समावेश आहे. तीज सणासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



