Pune Breaking News: पोलीस ठाण्यातच धुडगूस! सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुंडाची तोडफोड

•Pune Latest News: राजू उर्फ बारक्या लोंढेचा थरार; कॉम्प्युटर, खिडक्या फोडत पोलिसांपुढे दिला खुलेआम आव्हान
पुणे | एकीकडे सहकारनगर परिसरात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांवर पैलवानांनी दगडफेक केली होती, तर दुसरीकडे पोलिस ठाण्यातच थेट तोडफोड होण्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस यंत्रणेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
आरोपीचा थेट थरार पोलीस ठाण्यात!
सहकारनगर पोलीस ठाण्यात अटक करून आणण्यात आलेल्या राजू उर्फ बारक्या लोंढे या सराईत गुन्हेगाराने संतापाच्या भरात थेट पोलीस ठाण्यातच धुडगूस घातला. त्याने खिडक्यांच्या काचा फोडल्या, कॉम्प्युटरवर तुटून पडला आणि पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंबिंग ऑपरेशनदरम्यान आरोपीला अटक करून सहकारनगर पोलिसांनी ठाण्यात आणलं होतं. मात्र, पोलीस ठाण्याच्या सुरक्षिततेच्या चौकटीतच त्याने अशी अराजकता निर्माण केली.
पोलीस दलात चिंता; कायदा-सुव्यवस्थेचा धोका?
ही घटना केवळ एक गुन्हा नसून पोलीस व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा अपमान म्हणून पाहिली जात आहे. पोलीस ठाण्याच्या चार भिंतींमध्येच जर गुन्हेगार अशी मक्तेदारी गाजवत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्याची पाहणी केली असून, या घटनेनंतर पोलीस स्टेशनमधील सुरक्षा यंत्रणा आणि मनोबल दोन्ही डगमगल्याचे चित्र आहे.



