क्राईम न्यूजमुंबई
Trending

दादरच्या प्रतिष्ठित शाळेत खळबळ: अल्पवयीन विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात शिक्षिकेच्या धक्कादायक दाव्याने नवा ट्विस्ट!

Mumbai Latest Crime News : पंचतारांकित हॉटेलमध्ये घडले प्रकार, ‘किकी-पुकी’ संबोधनाचा उल्लेख; तपास यंत्रणांसमोर नवे आव्हान

मुंबई: दादर येथील एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षिकेने न्यायालयात सादर केलेल्या धक्कादायक माहितीमुळे या प्रकरणात नवे वळण आले आहे. आपण आणि तो विद्यार्थी प्रेमसंबंधात असून, त्यांच्यात परस्पर संमतीने शारीरिक संबंध होते, असा दावा शिक्षिकेने केला आहे. तिने न्यायालयात विद्यार्थ्याने लिहिलेली प्रेमपत्रे आणि मोबाईलवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट सादर करत जामिनाची मागणी केली आहे. Mumbai Latest Crime News

शिक्षिकेने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, “मी आणि तो काही काळ प्रेमसंबंधात होतो. तो मला पत्नी म्हणायचा. इतकेच नाही तर, ‘किकी’ आणि ‘पुकी’ अशा नावांनी तो तिला संबोधत असे,” असे चॅट मेसेजेसही तिने पुरावा म्हणून सादर केले आहेत. यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

दुसरीकडे, पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी यापूर्वी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला शिक्षिकेने गेल्या वर्षभरात मानसिक दबाव टाकून, दारू पाजून आणि औषधे देऊन आपल्या मुलाचे शारीरिक शोषण केल्याचे म्हटले आहे. हा धक्कादायक प्रकार कोणत्याही अंधाऱ्या कोपऱ्यात नव्हे, तर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडल्याचेही तपासात समोर आले आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षिकेने फसवून हॉटेलमध्ये नेऊन त्याचे शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका असून, पीडित विद्यार्थी अकरावीत असताना ती त्याला शिकवत होती. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला होता, ज्यात पीडित विद्यार्थीही सहभागी होता. याच दरम्यान शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये या शिक्षिकेने या विद्यार्थ्याला लैंगिक हावभाव दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुलाला हे आवडले नसल्याने त्याने शिक्षिकेला टाळण्यास सुरुवात केली. मुलगा आपल्याला टाळत असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तिच्या एका मैत्रिणीची मदत घेतली. या मैत्रिणीने मुलाला शिक्षिका आणि तो एकमेकांसाठी बनले असल्याचे सांगितले, त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने या विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेऊन तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर विद्यार्थी तणावात राहू लागला. तणावातून बाहेर येण्यासाठी या शिक्षिकेने त्याला काही औषधे देण्यासही सुरुवात केली, असे तपासात समोर आले आहे. आता शिक्षिकेच्या नव्या दाव्यामुळे या प्रकरणाचा तपास नव्या दिशेने होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0