मुंबई

Mumbai BEST Accident : मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक, वाहकसह सहा प्रवासी जखमी

•वनराई पोलीस चौकीसमोर अपघाताची दुर्घटना; खासगी वाहनामुळे बसचे नियंत्रण सुटले

मुंबई | मुंबईतील गोरेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसचा भीषण अपघात झाला. वनराई पोलीस चौकीसमोर घडलेल्या या अपघातात बस चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले असून बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

ही बस वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील बस असून ती दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. सकाळी 6.30 च्या सुमारास, वनराई पोलीस चौकीजवळील सेवा रस्त्यावरून एक खासगी वाहन अचानक बससमोर आले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर बस चालक आणि वाहकासह सहा प्रवासी जखमी झाले. विशेष बाब म्हणजे जखमी झालेल्या चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.या दुर्घटनेची माहिती मिळताच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मातेश्वरी कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी प्रवाशांची नावे
अशरफ हुसेन (66 वय)
सीताराम गायकवाड (60 वय)
भारती मांडवकर (56 वय)
सुधाकर रेवाळे (57 वय)
पोचिया कानपोची (30 वय) अमित यादव (35 वय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0