मुंबई

Mumbai Crime News : ॲन्टॉपहिलमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; एका आरोपीकडून 2 बंदुका, 49 काडतुसे ताब्यात

•12 बोर डबल बेरेल गन, लोखंडी रिव्हॉल्वर आणि काडतुसे पोलिसांनी जप्त

मुंबई :- ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी केलेल्या धाडीत अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सरबजीतसिंह कवलजीतसिंह बजवा (52 वय) याच्या घरातून 2 अग्निशस्त्रे, 49 जिवंत काडतुसे आणि 18 बोर कारटेजस मिळून आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(25) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ॲन्टॉपहिल परिसरातील बजवा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घरझडतीत किंमत अंदाजे 40 हजार रुपयांचा “फिलगन कानपूर 2010” लिहिलेला लोखंडी रिव्हॉल्वर, 10 हजार रुपयांची 12 बोर डबल बेरेल गन, 360 रुपयांचे 18 नग 12 बोर प्लास्टिक कारटेजस आणि 24,500 रुपयांची 49 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, उप आयुक्त (परिमंडळ-4) रागसुधा आर. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील सागर घस्ते, दिनेश पाटील, सुधीर माने, अनिल बाबर, निलेश माने, सोनावणे यांनी प्रत्यक्ष कारवाई केली.सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0