Navi Mumbai Police : “हरवलेली आशा पुन्हा उजळली!” – नवी मुंबई पोलिसांनी 11.91 लाखांचे मोबाईल शोधून परत दिले

Navi Mumbai Police Found Lost Mobile : चोरी – गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांचा पराक्रम; 12 दिवसांत 58 मोबाईल परत मूळ मालकांकडे
नवी मुंबई, (वाशी) :- एखाद्या सामान्य नागरिकासाठी मोबाईल हरवणे म्हणजे आयुष्याच्या आठवणी, संपर्क, व्यवहार आणि ओळख हरवण्यासारखेच. परंतु, नवी मुंबई पोलिसांनी या हरवलेल्या आशा पुन्हा जिवंत केल्या – 12 दिवसांच्या धडाकेबाज Navi Mumbai Police Found Lost Mobile शोधमोहिमेत तब्बल 58 मोबाईल परत मिळवून, ते मूळ मालकांच्या हातात ठेवत, 11.91 लाख रुपयांचा माल पुन्हा त्यांच्या घरात परत पाठवला. Navi Mumbai Police Latest News
डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर हसू – मोबाईल मिळाल्यावर नागरिक भावुक, पोलिसांचे आभार मानले

गुन्हे शाखा कक्ष-1, वाशी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मिशनमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आणि अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या निर्देशावरून या मोहिमेला गती मिळाली.पोलीस उपायुक्त अमित काळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना CEIR पोर्टलच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते पोलीस शिपाई विशाल सावरकर आणि कक्ष-3 चे पोलीस शिपाई संतोष तांदळे यांचा विशेष सहभाग होता. त्यांनी 12 मे 31 मे 2025 दरम्यान शेकडो मोबाईल क्रमांकांचा तपास घेतला आणि विविध ठिकाणी कारवाई करून हे मोबाईल हस्तगत केले.

आज 31 मे रोजी वाशी पोलिस ठाण्यामध्ये जे दृश्य पाहायला मिळाले ते मन हेलावून टाकणारे होते – अनेक नागरिकांचे मोबाईल त्यांच्याच हाती परत दिले गेले. कुणी आनंदाने हसले, कुणाच्या डोळ्यात पाणी तरळलं… आणि सर्वांनी एका आवाजात म्हटलं,”पोलीस आमचे रक्षकच नव्हे, तर आधारही आहेत!”


