मुंबई

Navi Mumbai Crime News : बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक, मेघालय पोलिसांची मोठी कारवाई

•नवी मुंबईतून मेघालय येथे स्थलांतरित झालेल्या बांगलादेशीय नागरिकांना आरोपींनी बेकायदेशीर बँक खाती उघडण्यास व आर्थिक व्यवहारात मदत केल्याची पोलिसांकडून चौकशी

नवी मुंबई :- बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांना मेघालय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये एका पुरुषासह एका महिलेचा समावेश आहे. मेघालय पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रान्झिट वॉरंट घेतल्यावर ही कारवाई करण्यात आली. सध्या नवी मुंबई पोलीस विभागात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणात तपास आणि अटकेची मोहिम राबवली जात आहे. या धडक कारवाईला घाबरून अनेक बांगलादेशी नागरिक नवी मुंबई सोडून पळून जात आहेत. काहीजण देशाच्या विविध भागांत लपण्याचा प्रयत्न करत आहेत.

मेघालय राज्यातील पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तेथील 20 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. तपासादरम्यान या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबईतील जबीर युनूस शेख आणि नुसरत हर्षद काझी यांनी विविध स्वरूपात मदत केल्याचे उघड झाले. या मदतीमध्ये त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, बँक खाती उघडून देणे आणि आर्थिक व्यवहारात मदत करणे यांचा समावेश होता.मेघालय पोलिसांनी ही माहिती नवी मुंबई पोलिसांना दिल्यानंतर संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. जबीर शेख व नुसरत काझी यांना नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर मेघालय पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट घेऊन त्यांना मेघालय येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0