Mumbai Crime Branch : गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मोका आरोपी शिवा शेट्टी अटकेत, 11 घरफोड्यांचा पर्दाफाश

Mumbai Crime Branch Unit 7 Latest News : मोका, हत्या प्रयत्न, जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपीवर पोलिसांची सतत पाळत
मुंबई :- गुन्हे शाखा कक्ष-7 Mumbai Crime Branch Unit 7 मुंबई यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या Kanjur Marg Police Station हद्दीत राहणाऱ्या शिवा आरमोगन शेट्टी (वय 29) या मोका कायद्यांतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपीला पुन्हा एकदा अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीने नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर आणि पालघर परिसरातील घरफोड्या व जबरी चोरी केल्याची कबुली दिले आहे.
आरोपीवर आधीपासूनच खूनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, आर्म्स अॅक्ट आणि मोक्का कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो 22 जानेवारी 2025 रोजी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाला होता. काही काळापासून तो राहत्या घरात न मिळाल्याने पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवले होते.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला कळवा (ठाणे) येथून त्याच्या पत्नीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने 11 गुन्ह्यांची कबुली दिली असून यामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला खारघर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


