क्राईम न्यूज
Trending

Mumbai Cyber Crime : मुंबईत धक्कादायक सायबर हल्ला! खाजगी कंपनीच्या डेटावर ताबा, 4.25 लाखांची बिटकॉइन खंडणी

Mumbai Latest Cyber Crime News : कुर्ल्यातील नामांकित जाहिरात कंपनीच्या सर्व्हरवर हॅकर्सचा कब्जा,डेटा परत मिळवण्यासाठी धमकीचं पत्र; ‘प्रोफेशनल हॅकर्स’कडून सल्ल्याचं आमिषही

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईतून एक थरकाप उडवणारी सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. कुर्ला परिसरातील एका खाजगी जाहिरात कंपनीचा सर्व्हर हॅक करून अज्ञात हॅकर्सनी महत्त्वाचा डेटा चोरी केला असून, तो परत देण्यासाठी तब्बल 4.25 लाख रुपयांची बिटकॉइनमध्ये खंडणी मागितली आहे. Mumbai Latest Cyber Crime News

घटना उघडकीस आली तेव्हा कंपनीचे कर्मचारी आणि व्यवस्थापक त्यांच्या अंतर्गत प्रणालीमध्ये लॉगिन करू शकत नव्हते. पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करताना उघड झालं की सर्व्हरवरील संपूर्ण डेटा गायब झाला आहे.

कंपनीने तातडीने सायबर तज्ज्ञांची मदत घेतली असता समोर आलं की, हॅकर्सनी नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज (NAS) हॅक करून सर्व फाइल्स एन्क्रिप्ट केल्या आहेत. त्याचबरोबर सिस्टममध्ये एक वर्ड डॉक्युमेंट सोडण्यात आलं, ज्यामध्ये धमकी आणि बिटकॉइनद्वारे पैसे देण्याचा ‘ऑफर लिंक’ दिला होता.

हॅकर्सनी स्वत:ला “प्रोफेशनल” म्हणून ओळख दिली असून, पैसे दिल्यानंतर डेटा परत मिळेल आणि भविष्यातील सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सल्लाही दिला जाईल,असंही नमूद केलं आहे. इतकंच नव्हे तर पैसे पाठवल्याचा पुरावा एका विशिष्ट ईमेलवर पाठवण्याचे निर्देश ही देण्यात आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सेंट्रल रीजन सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आयटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0