मुंबईठाणे
Trending

Panvel News : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होणार साजरा — राष्ट्रीय अध्यक्ष : गणेश कचकलवार

पनवेल जितिन शेट्टी : अल्पावधीतच महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हजारो पत्रकारांची टीम बनवून त्यांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देश पातळीवर अत्यंत वेगाने पसरत असलेली देशव्यापी संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे.याच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा ५ जूनला प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.
आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,सामाजिक,राजकीय सांस्कृतीक,शैक्षणिक,अध्यात्मिक,वैद्यकीय,कृषी तसेच प्रत्येक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा सत्कार व पत्रकारांना सन्मान या वर्धापन दिनी संघटनेच्या माध्यमातून देशभरात होणार आहे.
सध्या देशभरातील महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार,छत्तीसगड,झारखंड,हिमाचल प्रदेश,पंजाब,दिल्ली,कर्नाटका,तामिळनाडू,आंध्र प्रदेश,तेलंगाना,आसाम,गुजरात,राजस्थान,हरियाणा इत्यादी राज्यात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे २०२५ हे वर्ष संपण्याआधी संपूर्ण भारतभर म्हणजेच भारतातील संपूर्ण राज्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ असल्याचे आपणास पहावयास मिळेल असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिली आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ खरोखरच त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून पत्रकारांबरोबरच गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे,त्यामुळे संपूर्ण देशभरातून हजारोच्या संख्येने पत्रकार बांधव संघटनेस जुळत आहे.
महाराष्ट्रामध्ये तर तालुका व जिल्हानिहाय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवून,गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम युवा ग्रामीण पत्रकार संघ करत आहे.आपली कुणाशीही स्पर्धा नसून आपले ध्येय,उद्दिष्ट समोर ठेवून काम करत राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0