Sambhaji Nagar Bribe News : ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 50 हजारांची लाच;आरटीओ एजंटला एसीबीने रंगेहात पकडले

Sambhaji Nagar RTO Officer Arrested In Bribe Trap : आरटीओ एजंट दीपक साहेबराव पवार (43 वय) पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, एसीबी छत्रपती संभाजीनगर पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत मोटार वाहन निरीक्षक यांच्या नावाखाली आरटीओ एजंट याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. Sambhaji Nagar RTO Officer Arrested In Bribe Trap दीपक साहेबराव पवार (43 वय रा. गजानन नगर, गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर) असे आरटीओ एजंट याचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीचे दहा ट्रक ट्रेलर मधून डिझेल इंजिना छत्रपती संभाजी नगर ते चेन्नई अशी वाहतूक करण्यासाठी आरटीओ एजंट याने वाहन निरीक्षक यांच्याकडून कोणतीही कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे एसीबी कडून सांगण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक,(छत्रपती संभाजी नगर, एसीबी) दिलीप साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांचे ट्रान्सपोर्ट कंपनी असून त्यांचे कंपनी मार्फत दहा ट्रक ट्रेलर मधून डिझेल इंजिना ची छत्रपती संभाजीनगर ते चेन्नई अशी वाहतूक करताना संभाजीनगर आरटीओ विभागाच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून वाहन कारवाई विना जाण्यास मुभा देण्याकरिता मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी आरोपी दीपक पवार (आरटीओ एजंट) याने प्रतिवाहन पाच हजार रुपये असे एकूण दहा वाहनांचे पन्नास हजार रुपयां ची लाच मागणी केल्याची तक्रारदार यांनी 8 मे रोजी तक्रार दिली होती.
एसीबीने तक्रारीची पडताळणी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार आरोपी खाजगी दीपक पवार याची शासकीय पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता -तक्रारदार यांचे ट्रान्सपोर्ट कंपनी च्या दहा ट्रक ट्रेलर मधून डिझेल इंजिना ची छत्रपती संभाजीनगर वर वर लोड कारवाई न करण्यासाठी ते चेन्नई अशी वाहतूक करताना संभाजीनगर आरटीओ विभागा च्या वतीने मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी व छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी प्रतिवाहन पाच हजार रुपये असे एकूण दहा वाहनांचे पन्नास हजार रुपयां ची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 9 मे आरोपी यांनी लाच मागणीप्रमाणे तक्रारदार यांचेकडून शासकीय पंचा समक्ष पन्नास हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.



