Mumbra Robbery News : मुंब्रामध्ये चोरी ; घराचे कुलूप तोडत चोरट्याने घरात प्रवेश, लाखोचे दागिने लंपास

Mumbra Latest Robbery Crime News: बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, लाखोचे दागिने लंपास
ठाणे :- मुंब्रा परिसरात राहणाऱ्या तालीब मोहम्मद शेख (26 वर्ष) कामानिमित्त 5 मे आणि 6 मे दोन दिवसा करिता बाहेर गेले असता घरात कोण नव्हते. चोरट्याने या संधीचा फायदा घेत घरात कोण नसताना घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लाखो रुपयांचे दागिने लंपास करून दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना मुंब्रातून समोर आली आहे. या घटनेनंतर शेख यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Robbery News) तक्रार दाखल केली आहे. Thane Crime News
तालीब शेख यांनी दिलेला तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीवरून शेख कामानिमित्त बाहेर गेले असता घरात कोण नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात दरवाजाचे कुलूप तोडत आत मध्ये प्रवेश केला आणि घरातील सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 3 लाख 30 किमतीचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांकडून (Mumbra Police Station) या घटनेची तपासणी चालू असून या सर्व घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करत आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही च्या मदतीने आणि आजूबाजूच्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. Thane Crime News