पुणे

Pune Crime News : बँकॉकहून 10.3 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड तस्करी केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ कस्टम्सने 2 जणांना अटक केली आहे

•बँकॉकहून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हायड्रोपोनिक वीडची तस्करी केल्याच्या आरोपाखाली मुंबई विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे :- बँकॉकहून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हायड्रोपोनिक वीड तस्करी केल्याच्या आरोपाखाली मुंबई विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना अटक केली आहे.

बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या दोन प्रवाशांना विमानतळाव कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्या चेकिंग केलेल्या सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना 11 हवाबंद पाउच जप्त केले आहे यामध्ये 9864 ग्रॅम हिरव्या रंगाचा हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. तसेच मुंबईत एकाच वेळी केलेल्या पाठपुराव्यात तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 478 ग्रॅम चरस आणि हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बेकायदेशीर अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणपणे दहा कोटी तीन लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0