क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Latest News : धक्कादायक! अजितदादांच्या अंत्ययात्रेत मढ्यावरच्या टाळूचे लोणी खाण्याचा प्रकार; 20 लाखांची लूट

Pune Baramati Latest News : अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत साखळ्यांची चोरी; पोलिसांकडून सात जणांना बेड्या

बारामती | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागराचा महापूर लोटला असताना, याच दु:खद प्रसंगाचा फायदा काही सराईत गुन्हेगारांनी घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या गर्दीतून तब्बल 20 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

गर्दीचा घेतला गैरफायदा

बारामती येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना हजारो नागरिक शोकसागरात बुडाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लोकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि खिशातील रोख रक्कमेवर डल्ला मारला. रणजीत जाधव, विश्वजीत तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सोन्याच्या चेन चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस चक्रावून गेले होते. प्राथमिक तपासात साधारण 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांची तत्पर कारवाई; 7 जण अटकेत

या घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती तालुका पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने तपासचक्र फिरवले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी बीड, यवतमाळ आणि अहिल्यानगर येथील 7 संशयित आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

१. राजकुमार बाबुराव आठवले (बीड)
२. मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (यवतमाळ)
३. एजाज भगु मीरावले (यवतमाळ)
४. मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (यवतमाळ)
५. बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (इंदापूर)
६. तुषार कैलास मासाळ (अहिल्यानगर)
७. नितीन अंकुश गायकवाड (बीड)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0