मुंबईठाणे
Trending

‘सीएमओ’च्या नावाचा धाक! – उच्चपदस्थ अधिकारी भासवून झवेरी बाजारातील सराफाला 2 कोटी 80 लाखांचा चुना

Mumbai Scam News : लाल दिव्याची गाडी, सोने लिलावाचे आमिष आणि हिऱ्यांचे दागिने हडपले; फसवणूक केल्यावर सराफाला धमकावले

मुंबई :- मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून एका धूर्त ठगाने मुंबईतील झवेरी बाजारातील एका प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने लाल दिव्याची गाडी वापरली आणि नंतर धमक्या देऊन सराफाला गप्प करण्याचा प्रयत्न केला. Mumbai Latest Fraud News

जानेवारी 2024 मध्ये सराफाच्या घरमालकामार्फत मुख्य आरोपीची ओळख झाली. सीएमओ कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून आरोपीने सुरुवातीला पोस्ट स्टडीसाठी 20 लाख रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. ही रक्कम मिळाल्यावर आरोपीने सराफाच्या भावाची भेट घेऊन त्याला मुख्यमंत्र्यांशी ओळख करून देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, आरोपी लाल दिव्याच्या गाडीतून सराफाच्या घरी गेल्याने व्यापाऱ्याचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.

या विश्वासानंतर आरोपीने सीमाशुल्क विभागातील अधिकारी मित्र असल्याचे सांगून, तस्करीदरम्यान जप्त केलेले सोने 7 टक्के सवलतीत लिलावात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या सोने खरेदीसाठी सराफाने आरोपीला 1 कोटी 15 लाख 22 हजार 400 दिले. एवढेच नाही तर, आरोपीने सासूचे हिऱ्याच्या दागिन्यांचे शोरूम असून ते ऑनलाईन विक्री करत असल्याचे सांगून, बाजार भावापेक्षा जास्त किमतीत दागिने विकून देण्याच्या बहाण्याने सराफाकडून 1 कोटी 44 लाख 84 हजार 103 रुपयांचे हिऱ्याचे दागिनेही घेतले.

जेव्हा सराफाने वारंवार सोने आणि उसने दिलेले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागला. त्यानंतर त्याने एका राजकीय पक्षातील व्यक्तीला सोबत घेऊन सराफाच्या दुकानात जाऊन त्याला मारहाण, धमकी आणि शिवीगाळ केली. या गंभीर फसवणूक प्रकरणी अखेर सराफाने मुख्य आरोपी, त्याची सासू, घरमालक आणि अन्य दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0