मुंबईठाणे
Trending

मीरारोड :- सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर कार्यालयाच्या नूतनीकरणाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन

Mira Bhayandar Police Station inauguration News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन

मीरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या 7 कलमी कृती आराखडाचे विकास काम करण्यात आले आहे. Mira Bhayandar Police Latest News

परिमंडळ-1 मधील मिरारोड पोलीस ठाणेतील मुद्देमाल कक्ष, गोपनीय कक्ष, क्राईम कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, महीला कक्ष, जनरल डयुटी कक्ष, रायटर कक्ष, डिटेक्शन कक्ष, एटीसी कक्ष, अर्ज शाखा, अधिकारी कक्ष इत्यादी कक्षाचे कामकाज व सुशोभीकरण प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 यांच्या मार्गदशर्नाखाली करण्यात आलेले आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर कार्यालय यांचेही सुशोभीकरण करुन उद्घाटन करण्यात आलेले आहे.

मधुकर पाण्डेय (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., यांनी मिरारोड पोलीस ठाणे प्रवेशव्दाराची रिबीन कापून पोलीस ठाणेचे उद्घाटन केलेले आहे. पोलीस ठाणे उद्घाटनाचे वेळी, मधुकर पाण्डेय (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., पोलीस आयुक्तालय यांचेसह, दत्तात्रय शिंदे (भा.पो.से.), अपर पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., पोलीस आयुक्तालय, अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मि.भा.व.वि., प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1, मि.भा.व.वि., विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, मेघना बुरांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरारोड पोलीस ठाणे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी पोलीस ठाणेमध्ये केलेल्या कामकाज व सुशोभिकरणाबाबत प्रशंसा केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0