मुंबईठाणे
Trending

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवलीवर पाणी संकट! कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी आठ तास बंद

KDMC Water Supply News : कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. वीजवाहकाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (13 मे) रोजी करायचे असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात पाणी कपात आणि बंद असल्याचे सांगितले आहे

कल्याण :- कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील गावांचा पाणी पुरवठा मंगळवारी (13 मे) आठ तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. KDMC Water Supply News या आठ तासाच्या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी केले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचे उल्हास नदी काठी मोहिली येथे 100 दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि मोहिली उदंचन केंद्र आहे.या दोन्ही पाणी पुरवठा केंद्रांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 22 केव्ही एनआरसी कंपनी दोन वीजवाहकावरून (फिडर) विद्युत पुरवठा केला जातो. महावितरण कंपनीला एनआरसी दोन येथील वीजवाहकाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (13 मे) रोजी करायचे आहे. हे काम महावितरण कंपनीच्या अभियंता, ठेकेदाराकडून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत केले जाणार आहे.

मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पश्चिम परिसर, टिटवाळा, मांडा, शहाड, आ्ंबिवली, अटाळी, मोहने, जेतवननगर, माण अटाळी परिसरातील पाणी पुरवठा केला जातो. मोहिली जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिम, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा मंगळावारी बंद राहणार आहे, असे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0