मुंबईक्राईम न्यूज

Nalasopara Crime News : कार चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा भांडाफोड – गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!

गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर दोन आरोपी जेरबंद, वॅगनार कारसह गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत; नागरिकांमध्ये पोलीस कारवाईचं कौतुक

नालासोपारा :- अंधाराच्या आड दडलेली कार चोरांची टोळी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकली! गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांनी एका धडाकेबाज कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करत चोरलेली वेंगनार कार तसेच गुन्ह्यात वापरलेली दुसरी कार जप्त केली आहे.

13 मे रोजी डांगेवाडी, नालासोपारा पश्चिम येथून (MH03/ES1191) वॅगनार कार चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. रात्री 1 ते सकाळी 9 वाजेदरम्यान गाडी गायब झाली होती. अज्ञात चोरट्याने कार उभी असताना ती हुशारीने लंपास केली होती.

पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली गेली. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इर्शाद बैतुल्ला शहा (30 वय) आणि हसन किस्मत शेख (39 वय) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी गेलेली वॅगनार कार आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुसरी कार पोलिसांनी हस्तगत केली आहे.आरोपींना पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीप्रकरणी असलेली भीती काही अंशी कमी होणार असून, पोलिसांची तत्परता आणि नियोजनबद्ध तपास कौतुकास्पद आहे.

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय , अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0