Mumbai Robbery Case : नाकाबंदीचा ‘सुपर हिट’ कारवाई! मंदिरातील चोरीचा उलगडा, दोन जेरबंद

Wadala Police Latest News : वडाळा पोलिसांची सतर्क कारवाई; मंदिरातील दानपेटी व मुकुटासह मुद्देमाल हस्तगत
मुंबई, (वडाळा) :- रात्रीच्या अंधारात चोरी करून पसार होणाऱ्या चोरट्यांचा वडाळा पोलिसांनी Wadala Police News नाकाबंदी दरम्यान लावलेला तगडा सापळा यशस्वी ठरला. गोदरेज जंक्शन फ्री वे ब्रिजखाली करण्यात आलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी दोन संशयितांना अडवले आणि टॅक्सीतून मंदिरातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करत गावदेवीतील गुन्ह्याचा सुगावा लावला. Mumbai Police Latest News
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रात्रपाळीतील नाकाबंदी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल पथक कार्यरत होते. यावेळी पोलीस हवालदार सागर पवार यांनी एका संशयास्पद टॅक्सीची (MH 01 AT 2944) तपासणी केली असता, दोन इसमांकडे एक स्टील दानपेटी आणि अंदाजे 50 ते 60 ग्रॅम वजनाचा मुकुट आढळून आला. चौकशीत त्यांनी सदर वस्तू भुलाबाई देसाई रोड येथील शनिमंदिराशेजारील स्वामिनारायण मंदिरातून चोरल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपी – रफीउल्ला एहसान उल्ला खान (26 वय) आणि राजु लक्ष्मण कांबळे (21) – हे अँटॉपहिलच्या चिखलवाडी भागातील रहिवासी असून, त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून, त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली तात्काळ प्रतिक्रिया आणि सतर्कता यामुळे महत्त्वाच्या चोरीप्रकरणाचा छडा लावता आला.पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त अभिनव देशमुख, वडाळा विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.



