
- टीडीएसची तसेच आधार व पॅन लिंक न केल्याने त्याचा दंड वसूल
पुणे, दि. १२ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Corporation on IT Radar
इन्कम टॅक्स विभागाच्या ‘रडार’वर पुणे महापालिकेतील कर्मचारी आले आहेत. इन्कम टॅक्स विभागाने महापालिकेत लक्ष पुरविल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. टीडीएस तसेच आधार व पॅन लिंक न करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध दंड वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. Pune Corporation on IT Radar
टीडीएस तसेच आधार व पॅन लिंक न करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून रक्कम वसूल करू नये व महापालिका प्रशासनाने पगार अडवू नयेत अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियनने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने आणि महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराच्या चुकीमुळे हा भूर्दंड लागला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहे. Pune Corporation on IT Radar

चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाल्यापासून त्यांच्यावर प्राप्ती कर लागू झाला आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांना त्याबाबत काहीही माहिती नव्हते. त्यांना आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासही सांगण्यात आले होते. पण त्याची देखील त्यांनी पूर्तता केली नाही.

प्राप्तीकर विभागाने केलेल्या तपासणीमध्ये पुणे महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. या विभागाने महापालिकेला यासंदर्भातील माहिती पाठवून दिली आहे. ही रक्कम हजारांपासून ते दीड लाखाच्या घरात आहे. प्राप्तीकर विभागाकडून ही रक्कम दोन हप्त्यात वसूल केली जाणार असल्याने अनेकांना तर दोन महिने पगार मिळणार नाही अशीच अवस्था आहे.