Pune News | धक्कादायक ! पुण्यात कचरा प्रकल्पात बाल कामगारांचे शोषण : गुन्हा दाखल झाल्याचे उघडकीस

- अद्याप कंपनीविरुद्ध कारवाई नाही ?
- घनकचरा विभागात सावळा गोंधळ
पुणे, दि. २३ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर Pune News
हडपसर औद्योगिक वसाहत शेवकर वस्ती येथील कचरा प्रकल्पात बाल कामगाराकडून काम करून घेतले जात असल्याने खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने पुणे मनपातील घनकचरा विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. दुकाने निरीक्षक यांनी तक्रार दिल्यावरून संबंधित कंपनी मालक व ठेकेदार यांच्यावर गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Pune News
याबाबत Wanwadi Police Station वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी मे. आदर्श भारत इन्व्हायरो प्रा. ली. चे मालक मिलिंद हरिश्चंद्र पवार, नरेंद्र रामदास सावंत व ठेकेदार रवींद्र नवनाथ म्हस्के यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कमी पैशात, जास्त वेळ लहान मुलांचे शोषण
यावेळी दुकाने निरीक्षक यांनी सदर बाल कामगारांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी ९ ते १० हजार रुपये मासिक वेतनावर सकाळी १० ते साय ६ असे राबवून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे मनपातील Pune Corporation घनकचरा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने घनकचरा विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे.
संबंधित कंपनीवर कारवाईस टाळाटाळ !
बाल कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनी विरुद्ध पुणे महापालिकेकडून अद्याप कारवाई झाली नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात बाल कामगारांचे शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असताना देखील कंपनीवर बंधने घालण्यात आली नाहीत.



