क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Robbery News : पिंपळेश्वर मंदिरातील चोरीचा 24 तासांत छडा! दानपेटी फोडणारा ‘सीसीटीव्ही’मुळे जेरबंद; 8 हजार रुपये जप्त!

Mumbai Dahisar Police Solve Robbery Case : दहिसर पोलिसांची वेगवान कामगिरी: गुप्त माहिती आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरटा गजाआड!

मुंबई :- मुंबईतील दहिसर परिसरात पिंपळेश्वर महादेव मंदिरात घरफोडी करून चोरी केल्याची घटना ताजी असतानाच, दहिसर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून ही चोरी उघडकीस आणली आहे. मंदिराचे ट्रस्टी रमेश हिरा पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. चोरट्याने मंदिरात असलेल्या तीन दानपेट्या तोडून त्यातील अंदाजे 8000 रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनामध्ये मोठी खळबळ माजली होती. Mumbai Latest Robbery News

25 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास: आरोपी झाला हजर

मंदिरात झालेल्या या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला दहिसर पोलिसांनी तातडीने सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील तब्बल 25 ते 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजमधील बारकाईने केलेल्या विश्लेषणासोबतच पोलिसांनी गुप्त माहितीचा आधार घेतला. अखेर, तपास पथकाने बादलकुमार रामतार दास (वय 20, रा. दहिसर पूर्व) या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या उत्कृष्ठ कामगिरीमुळे चोरीचा गुन्हा 24 तासांत उघडकीस आला.

रोख रकमेसह इतर मुद्देमाल जप्त: दोन गुन्हे उघड

अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मंदिरातील चोरीस गेलेली 8000 रुपये रोख रक्कम पूर्णपणे जप्त केली आहे. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेली एक कार बॅटरी (टूक व ऑटोरिक्षाची बॅटरी) देखील हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे केवळ मंदिरातील चोरीच नव्हे, तर दहिसर पोलीस ठाण्यातील अन्य एका चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यश

अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त महेश चिमटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिनपाल वाघमारे आणि त्यांच्या पथकाने गोपनिय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा कौशल्याने वापर करून ही कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0